Mahavir Jayanti Special: महावीर जयंतीनिमित्त पाहा ‘सत्यलोक’ने सादर केलेला हा माहितीपट

0

एमपीसी न्यूज (भार्गव जोशी) – महावीर जयंतीच्या निमित्ताने वर्धमान महावीर यांची शिकवण आणि जैन धर्माची माहिती सांगणारा video आज ‘सत्यलोक’ च्या वतीने youtube आणि instagram या दोन्ही ठिकाणी प्रकाशित केला आहे. हा video बनवण्यासाठी Britannica Encyclopedia आणि Oxford University Press ने प्रकाशित केलेल्या ‘Jains in the world: Religious values and ideology in India’ या पुस्तकातून माहिती व संदर्भ घेतलेले आहेत.

मी भार्गव मंगेश जोशी, रा पुणे. माझे mechanical engineering चे शिक्षण पूर्ण झाले असून, मी पुढील शिक्षण Aerospace Engineering या क्षेत्रात घेत आहे. मला पहिल्यापासूनच खगोलशास्त्र आणि  भारतीय संस्कृती याचा अभ्यास करण्याची आवड आहे व त्यासाठी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या ज्योतीर्विद्या परिसंस्थेत मी गेली सहा वर्षे स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. यातूनच मला आपल्या भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्याची व त्यावर सर्वांच्या माहितीसाठी एक documentary series बनवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मी माझ्या समवयस्क व समविचारी अशा 45 मित्र-मैत्रीणीच्या सहाय्याने एक ‘सत्यलोक’ नावाची टीम बनवली व या टीमच्या माध्यमातून आम्ही ही documentary series बनवायला सुरूवात केली व त्याचे उद्घाटन आम्ही या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिला video प्रकाशित करून केले.

_MPC_DIR_MPU_II
अशा प्रकारच्या 108 videos ची documentary series आम्ही बनवत आहोत. ह्या documentary series मध्ये भारतीय खगोलशास्त्र, भारतीय स्थापत्य शास्त्र, भारतीय गणित, भारतीय इतिहास, संस्कृत साहित्य अश्या अनेक विषयांवर Peer-reviewed research papers मधूनच संशोधन करून, सत्य व वास्तव माहिती समाजा पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वांनी  ही documentary series आवर्जून पहावी, आवडल्यास आमच्या Youtube channel ला subscribe करावे. पुढील माहितीसाठी संपर्क आमच्या अधिकृत website वर मिळेल. https://www.projectsatyaloka.in/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment