Pimpri : संजय ताकसांडे यांना बडतर्फ करण्याची  संतोष सौंदणकर यांची मागणी  

एमपीसी न्यूज – संजय ताकसांडे या भ्रष्ट अधिका-याची चौकशी करुन त्यांना महावितरण सेवेमधून तडकाफडकी बडतर्फ करण्याची मागणी शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, संजय ताकसांडे यांच्या अनिर्बंध भ्रष्ट कारभाराबाबत महावितरण कंपनीच्या सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न खाऊंगा न खाणे दुंगा या धोरणाच्या विरुध्द कारभार आपल्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीमध्ये सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्याबाबतीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली आहे. ऊर्जामंत्री माझ्या पाठीशी आहे. मला कोणाचीही भीती नाही. माझे कोणी काहीही बिघडवू शकत नाही. असे ताकसांडे यांचे म्हणणे आहे. तरी महावितरण कंपनीतून ताबडतोब बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.