Mahavitaran : वीजदरवाढ 37 टक्के नाही तर 14 टक्कयांनी, 37 टक्के वीज दरवाढीचे वृत्त चुकीचे

एमपीसी न्यूज –  महावितरणने महसुली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत आगामी दोन आर्थिक वर्षात सरासरी 37 टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्याचे विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले परंतु हे वृत्त चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. (Mahavitaran) महावितरणने सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी 2023-24 2024-25 या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी अनुक्रमे 14 टक्के आणि 11 टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित केली असून ही सरासरी प्रस्तावित दरवाढ अडीच रुपये नसून एक रुपयाच्या जवळपास आहे. प्रस्तावित सरासरी दरवाढीमध्ये स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचा समावेश केलेला आहे, असे महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

वीज नियामक आयोगाने 2020-21 च्या आर्थिक वर्षापासून महावितरणसाठी बहुवार्षिक दररचना मंजूर करताना महावितरणसाठी जो महसूल अंदाजित केला होता तो महसूल कोरोना महासाथ आणि कोळशाच्या संकटामुळे वाढलेला खर्च यासह विविध कारणांमुळे गोळा झाला नाही.

Chinchwad News : पोट निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडे 6 इच्छुकांचे अर्ज

परिणामी गेल्या चार आर्थिक वर्षातील महसुली तूट आणि आगामी दोन आर्थिक वर्षातील अपेक्षित तूट या सहा वर्षांच्या तुटीचा विचार करता महावितरणने आगामी दोन वर्षात (Mahavitaran) भरपाई करण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.