Talawade : लाईट गेली म्हणून महावितरण कार्यालयात केली खुर्च्यांची तोडफोड, सात जाणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अंडरग्राऊंड केबल जळाल्यामुळे विज खंडीत झाली होती. या रागातून पाच ते सात जणांनी तळवडे येथील महावितरण कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत,(Talawade) शिवीगाळ करत गोंधळ घालण्यात आला. हा सारा प्रकार सोमवारी (दि.9) संध्याकाळी घडला.

याप्रकरणी राहूल एकनाथ इंगळे (वय 33 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वैभव जिरे, दत्ता राऊत, विभिवान पोकळे (रा. रुपीनगर) महिला आरोपी, नारायण जिरे व इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.

MPC News Podcast 11 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर येथील अंडरग्राऊंड केबल जळाली होती. त्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता. (Talawade) या रागातून आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादी दुरुस्तीचे काम करत असताना आरोपी तेथे आले त्यांनी शिवीगाळ करत कार्यालयातील खुर्च्या तोडफोड केली व सराकारी कामात अडथळा निर्माण केला यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.