Mahavitaran : वीजबिल भरा, कारवाई टाळून पाडवा गोड करा

एमपीसी न्यूज : चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक (Mahavitaran) आहेत. तर दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुट्टींच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरुन कारवाई टाळावी व गुढीपाडवा गोड करावा असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.

 

पुण्यातील सहा तालुके व सोलापूर, सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरण बारामती परिमंडलात 4 लाख 65 हजार 674 अकृषी वीजबग्राहकांची थकबाकी तब्बल 1149 कोटींवर पोहोचली आहे. या अकृषी थकबाकीमध्ये दिवाबत्तीची सर्वाधिक 875 कोटींची थकबाकी आहे. त्याखालोखाल पाणीपुरवठा 208 कोटी, घरगुती 40 कोटी, सार्वजनिक सेवा 9 कोटी 45 लाख तर वाणिज्यिक ग्राहकांकडे 8 कोटी 79 लाखांची थकबाकी येणे आहे. मंडल निहायमध्ये सर्वाधिक (Mahavitaran) थकबाकी सोलापूर जिल्ह्यात 578 कोटी, तर सातारा जिल्ह्यात 202 कोटी आणि बारामती मंडलात ही थकबाकी 368 कोटी इतकी आहे.

 

थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा महावितरणचे कर्मचारी ग्राहकांपर्यंत पोहचून थकबाकी वसुली करत आहेत. परंतु, वसुली करताना वीज कर्मचारी व ग्राहक यांच्यात संघर्ष देखील होत आहे. हा संघर्ष टाळून ग्राहकांनी आपले वीजबिल तातडीने नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर किंवा ऑनलाईन भरावे. तसेच थकबाकीमुक्तीची गुढी उभारुन आपली सामाजिक प्रतिष्ठा राखावी असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.

MHADA : ‘म्हाडा’ ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री

 

वीजबिल भरण्यासाठी …

ग्राहकांना वीजबिल भरता यावे याकरिता सर्व सुट्टींच्या दिवशी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय रांगा टाळून घरबसल्या कधीही ऑनलाईन वीजबिल भरता येते. त्यासाठी वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅनकरुन कोणत्याही युपीआय ॲपद्वारे वीजबिल भरावे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व महावितरण मोबाईल ॲपद्वारेही सहज व घरबसल्या कोठूनही वीजबिल भरता येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.