Pimpri : महावितरणचा अजब कारभार

ठेकेदार बनला महावितरणचा जनमाहिती अधिकार

आकुर्डी उपविभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार

एमपीसी न्यूज –   प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीच्या वीज तोडणीची कामे अतिशय  बेजबाबदारपणे बसविण्यात आलेली रोहित्रे व इतर संबंधित वीज उपकरमांविषयी माहिती मिळण्याबाबत  विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्याकरिता अर्ज केला होता. पण माहिती मिळालीही ती अपूर्ण देण्यात आली.   माहिती अधिकार कायद्याचा गोपनीयतेचा भंग करुन विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांची माहिती  तत्सम व्यक्तीला देणा-या आकुर्डी उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता अमित पाटील व माहिती अधिकारी श्री कवडे  यांच्यावर कारवाई करावी यांच्यावर त्वरीत कारवाई  महावितरण यांनी करावी अशी मागणी विद्युत  वितरण समितीने राहूल कोल्हटकर यांनी  केली.

आजही शासकीय कार्यालयात  माहिती अधिकार या कायद्याला बगल देण्याचे किंवा अर्जदाराची दिशाभूल करण्याची, चुकीची माहिती देण्याचे अर्ज व अर्जदाराची गोपनीय माहिती उघड करण्याचे काम शासकीय अधिकारी यांच्याकडून होत आहे. याचा प्रत्यय महावितरण भोरी विभागीय कार्यालय व आकुर्डी उपविभागीय कार्यालय व विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांना आला आहे.

संबंधित इमारतीच्या वीज जोडणीची कामे बेजबाबदारपणे केलेल्या चुकीच्या कामाबाबत व गैरकारभाराबाबत मुख्यमंत्री, उर्जामंत्री, व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांना तक्रार केल्यानंतर संबंधीत झालेले चुकीचे काम काढून टाकम्या आले, जे काही भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे पुरावे दिसत होते. ते नष्ट करण्यात आले. या प्रकारावरुन महावितरण कंपनी व संबंधित ठेकेदार आस्थापन यांनी केलेला गैरव्यवहाराचे पुरावे दिसत होते ते नष्ट करण्यात आले. गैरव्यवहार लपविण्यासाठी माहिती अधिकार कायद्याला सुध्दा महावितरणचे  कर्मचारी अमित पाटील व कवडे हे धाब्यावर बसवत आहे. तसेच चुकीची व दिशाभूल करणारी माहिती अधिकार कायद्याची खूप मोठी उदासिनता म्हणावी लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.