Mahavitaran : महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार

एमपीसी न्यूज – पुणे परिमंडलातील 7 लाख 88 हजार 881 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे 191 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी त्वरीत हा वीजबील (Mahavitaran ) भरणा करावा, यासाठी महावितरणतर्फे सुट्टीच्या दिवशी वीजभरणा केंद्र सुरु राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे.

थकीत वीजबिलात घरगुती 6 लाख 81 हजार 208 ग्राहकांकडे 121 कोटी 81 लाख, वाणिज्यिक 96 हजार 316 ग्राहकांकडे 47 कोटी 3 लाख व औद्योगिक 11 हजार 357 ग्राहकांकडे 22 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 27) व रविवारी (दि. 28) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीज ग्राहकांना बिलाचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट  व मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

Pimpri : शाळेचं पुनर्वसन करा, झोपडपट्टी पुनर्वसनाची गरज पडणार नाही – राजेश अग्रवाल

पुणे शहरात घरगुती 3 लाख 2 हजार 232  ग्राहकांकडे 48 कोटी 18 लाख, वाणिज्यिक 48 हजार 352 ग्राहकांकडे 19 कोटी 78 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 139 ग्राहकांकडे 2 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी आहे. पिंपरी चिंचवड शहरात घरगुती 1 लाख 36 हजार 913 ग्राहकांकडे 26 कोटी 17 लाख, वाणिज्यिक 22 हजार 149  ग्राहकांकडे  11 कोटी 57 लाख, औद्योगिक 4 हजार 226 ग्राहकांकडे 10 कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती 2 लाख 42 हजार 63 ग्राहकांकडे 47 कोटी 45 लाख, वाणिज्यिक 25 हजार 815 ग्राहकांकडे 15 कोटी 68 लाख, औद्योगिक 3 हजार 992 ग्राहकांकडे 9 कोटी 1 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात (Mahavitaran ) आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.