Pune : काँग्रेसची दिवाळखोरी, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा चांगल्या कामावर महायुतीला 220 पेक्षा जास्त जागा मिळणार – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – काँगेसची दिवाळखोरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या कामामुळे महाराष्ट्रात महायुतीला 220 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पुण्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार गिरीश बापट, माजी विरोधी पक्षनेते उजवल केसकर, आरपीआयचे अध्यक्ष अशोक शिरोळे, परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.

देशाला पुढे नेण्याचा कार्यक्रम भाजपकडे आहे. दिवाळखोरीपणा, राष्ट्रविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसचे जनतेच्या मनातून उतरली आहे. काश्मीरमध्ये गोलिया चल रही है, असे वक्तव्य राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केले. हीच भाषा पाकिस्तान बोलत आहे. 75 दिवसांत एक भी गोली चली नही. सोमवारपासून त्या ठिकाणी मोबाईल सुरू होत आहेत. कॉलेज, कोर्ट, दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. मुलीला खायला मिळत नसल्याचे चित्र दाखवण्यात आले. पण, ते चित्र सिरियाचे होते, असा घणाघातही जावडेकर यांनी काँग्रेसवर केला.

संसदेत 370 कलम हटविण्यासाठी काँग्रेसने बाजूने मतदान केले. पण, विरोधात बोलले. काँगेसचे नेते अजिरंजन चौधरी यांनी युनोला प्रस्ताव दाखविला का? अशी विचारणा केली. 24 तास काम करणारा आमचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पश्चिम महाराष्ट्र्रापूर्ती राहिली आहे. हा पण गड आम्ही फत्ते करणार असल्याचे जावडेकर यांनी निक्षून सांगितले. काँगेस देशात संपली आहे. 25 जागा लढविणारा पक्ष विरोधी पक्ष करण्याची मागणी करीत असल्याचे सांगत राज ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. राम मंदिर हवे की नको, काँग्रेस सांगत नाही. या संबंधीची अंतिम सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. पण, काँग्रेसकडून 2024 ला सुनावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी मुद्दामून खटला लांबविला आहे. खरे मंदिर झाले असून, भव्य मंदिर होण्याची वाट आहे. धार्मिक ट्रस्ट, संस्थानचा माध्यमातून त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. एनआरसी ही राजू गांधी यांचे अपत्य आहे. जीएसटी ही काँगेसची देण आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा टॅक्स सुरू करण्यात आला. आता त्याला काँग्रेस गब्बर सिंग टॅक्स बोलत असल्याची आठवणही जावडेकर यांनी करून दिली.

दरम्यान, मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मग 220 महाराष्ट्रात जागा कशा मिळणार, असा सवाल केला असता, या दोन्ही समाजाला आरक्षण मिळाले आहे. आमच्या काळात भ्रष्टाचार संपवण्यात आला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर जनतेचा असलेल्या विश्वासामुळे हा आकडा आम्ही पार करणार असल्याचा पुनरुच्चार जावडेकर यांनी केला. तर, या पत्रकार परिषदेवेळी वारंवार लाईट जात असल्याने गोंधळ उडाला.

कोट्यवधी झाडे लावली
मुंबईतील आरे भागात 2 हजार पेक्षा जास्त झाडे रात्री तोडण्यात आली. त्यावर विचारले असता, मग झाडे दिवसा तोडायला पाहिजे होती का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. 1 झाड तोडले तर 5 झाडे लावण्यात आली आहेत. 15 हजार स्केअर किमी वर कोट्यवधी झाडांची लागवड केल्याचे जावडेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.