_MPC_DIR_MPU_III

Bhosari : महेशदादा पुन्हा आमदार होणारच; लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा मोशी, डुडूळगावकरांचा निर्धार

मोशीत मेळावा, नागरिकांची मोठी गर्दी  

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाच वर्षात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. विविध कामे प्रगतीपथावर आहेत. महेशदादा पुन्हा आमदार होणार असल्याची काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. पण  लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा निर्धार मोशी, जाधववाडी, डुडूळगावकरांनी केला आहे. महेश लांडगे यांच्यामुळेच समाविष्ट गावातील साध्या घरातील दोघेजण शहराचे महापौर झाले आहेत, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान,मेळाव्याला नागरिकांची मोठी गर्दी होती.

_MPC_DIR_MPU_IV

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मोशी, डुडूळगाव आणि जाधववाडी परिसरातील कार्यकर्त्यांचा मोशीतील जय गणेश मंगल कार्यालयात भव्य संकल्प मेळावा बुधवारी (दि.25) पार पडला. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे, सुवर्णा बुर्डे, साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, नगरसेवक वसंत बो-हाटे, लक्ष्मण सस्ते, सागर हिंगणे, माजी उपमहापौर शरद बो-हाटे, युवा नेते रवी जांभूळकर, माजी उपसरपंच विठ्ठल कामठे, बबनराव बो-हाटे, विजय सस्ते, मंगल आल्हाट, विश्राम कुलकर्णी, सुरेश तळेकर, चंद्रकांत तापकीर, सतीश जरे, संतोष राठोड, नितीन आहेर, निखील बो-हाडे, राहुल रस्ते, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, भोसरी फार्मासिस्ट असोसिएशन यांनी आमदार लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 2014 ला कोणत्याही पक्षाने हात दिला नव्हता. भोसरीतील पैलवान एकटा पडला होता. परंतु, जनतेने हात देत अपक्ष म्हणून निवडून दिले. प्रवाहात, वादळात ताकद देऊन निवडून दिले. आम्ही विरोधाला विरोध मोशीतून नाहीसा केला आहे. राजकारणाने माणसे दुखतात. पण, आपण माणसे जोडण्याचे काम करायचे आहे. माझे कार्यकर्ते माणसे जोडण्याचे काम करत आहेत.आमच्यासोबत असणा-या नागरिकाच्या परिवाराचा विश्वास आमच्यावर आहे. आजपर्यंत एक टक्काही कोणाचा नुकसान झाले नाही. कोणाचे कधीच वाईट करत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत साथ देणा-यांसोबत मी कायम आहे. दुस-यासाठी त्याग करणारी आमची टीम आहे.

15 वर्षापूर्वींच पाण्याचा प्रश्न सोडविला असता तर समाविष्ट गावातील नागरिकांना आज पाण्याची समस्या उद््भवली नसते. आम्ही भामा-आसखेडचे पाणी आणत आहोत. दिघीत कच-याचे डोंगर झाले होते. कचरा आणून डंपिंग करुन ठेवला होता. त्यावर काहीच कारवाई केली नाही. केवळ निवडणूक आली की कच-यावर प्रक्रिया करणार, पाणी आणणार, रस्ते विकसित करणार, असे सांगितले जात होते.आम्ही व्हिजन ठेवून कामे करत आहोत. व्हिजन 2020 अंतर्गत कामे सुरु केली आहे. 2020 पर्यंत सगळी कामे मार्गी लावणार आहोत. भोसरी मतदारसंघ कुटुंब आहे. कुटुंब म्हणून मतदारसंघात काम करतो. आजचे काम उद्या होईल. पण होईल ते विश्वास मी तुम्हाला देतो. फक्त कोणाच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका, तेढ निर्माण करत नाही. सर्वांना मिळून घेऊन काम करत आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापौर राहुल जाधव म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी कामाचा झपाटा लावला. भोसरी मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. मोशीतील कचरा डेपोचा प्रश्न सर्वांना सतावत होता. त्यासाठी ‘वेस्ट टू इनर्जी’चा प्रकल्प आणून रोगराई मुक्त केले आहे. मोशीत सफाई पार्क साकारण्यात येणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न मार्गी लावले आहेत. समाविष्टगावाला प्रतिनिधीत्व दिले. महापालिका, पोलीस आयुक्त, प्राधिकरणाच्या अध्यक्षांसोबत संवाद साधला. मतदरासंघातील आरक्षण विकसित होतील. ‘व्हीजन 20-20’ सत्यात उतरेल. तेव्हा भोसरीत अमेरिका उतरलेली दिसेल. त्यामुळे दादांनी सर्वांच्या घरात स्थान निर्माण केले आहे. दादांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे.

माजी उपमहापौर शरद बो-हाटे म्हणाले, आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावातील आयसीयूमधून बाहेर काढले आहे. त्यांनी समाविष्ट गावात विकासाची गंगा आणली आहे. त्यांच्यामुळेच समाविष्ट गावाचा कायापालाट होत आहे. मागील वेळी पेक्षा ग्रामीण भागातून अधिक मताधिक्य तुम्हाला मिळेल. शहरातून सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून येतील.

युवा नेते रवी जांभूळकर म्हणाले, ”आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच समाविष्ट गावातील साध्या घरातील दोघे महापौर झाले आहेत. त्यांनी समाविष्ट गावाला न्याय दिला. वारकरी संप्रदायाला चालना मिळण्यासाठी चिखलीत संतपीठ उभारण्यात येणार आहे. चिखलीत संत पीठाचे काम सुरु आहे. संत पीठातून वारकरी संप्रदायाचे शिक्षण विद्यार्थी घेतील. मोशीतील पुण्यात होणारा कचरा डेपोचा प्रकल्प दादांनी हाणून पाडला. या जागेत भारतातील पहिले सफारी पार्क होणार आहे. यामुळे शहराच्या विकासात मानाचा तूरा रोवला गेला आहे. बीआरटी मार्ग झाला आहे. भामा-आसखेड धरणातून समाविष्ट गावातील लोकांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दूर होईल. स्पाईन रोडचा प्रश्न निकालात काढला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला दादा धावून गेले होते.

विश्राम कुलकर्णी म्हणाले, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांमुळे नागरिकांना रोजगार मिळणार आहे. नितीन आहेर म्हणाले, व्हिजन 20-20 अंतर्गत संतपाठी, मेट्रो, समाविष्ट गावातील रत्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. अनेक कामे मार्गी लावली आहेत. दादा नागरिकांच्या सुख, दुखा:त सहभागी होत आहेत. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न मार्गी लावला जातो. सुरेश तळेकर म्हणाले, भोसरीत रेशन कार्यालय, पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावला. समाविष्ट गावात मोठी विकास कामे होत आहेत. इंद्रायणीमाई प्रदूषण मुक्त केली जाणार आहे. भोसरी पुलाखाली वाहतूक कोंडी सोडविण्यात येणार आहे. राहुल रस्ते म्हणाले, बैलगाडा शर्यतीसाठी आमदार लांडगे यांनी अनेक प्रयत्न केले. विधीमंडळात कायदा संमत करून घेतला. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हा विषय अडकला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.