-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari : रेडझोनच्या प्रश्नासंदर्भात महेश लांडगे यांचा तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे पाठपुरावा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील अनेक भागात रेडझोनचा जटील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे अनेक नेत्यांनी कानाडोळा केला. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी याबाबत तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा केला. पर्रीकर यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत रेडझोनबाबत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, देशात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये पर्रीकर गोव्यात परतले. पण आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा नवीन संरक्षण मंत्र्यांकडे देखील कायम ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत दिघी मॅगझिन डेपो 1952 साली स्थापन झाला. केंद्र सरकारने सदरचा भाग ‘रेडझोन’ म्हणून 1990 साली घोषित केला. 1952 ते 1990 दरम्यान या भागात अनेक नागरिकांनी जमीन खरेदी-विक्री तसेच बांधकामे केली आहेत. 1965 ते 2014 अखेर तब्बल 40,000 बांधकामे, 2 लाख नागरिक आणि अनेक लघुउद्योजकांचे वास्तव्य रेडझोनमध्ये आहे. आगामी काळात अत्यंत जटील असलेला हा रेडझोनचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यामार्फत केंद्रीय मंत्र्यांकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी केली आहे. याबाबत लवकरात लवकर बैठक घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

स्थानिक नागरिक सुभाष माळी म्हणाले, “मागील अनेक वर्षांपासून रेडझोनचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे रेडझोन बाधित क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा, जमिनी, सदनिकांचे व्यवहार आणि अन्य प्रकारच्या व्यवहारांवर मर्यादा येत आहेत. पाच ते सात संरक्षण मंत्र्यांनी शहरातील रेडझोनचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रश्न मार्गी लागला नाही. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीतील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर आदी परिसरातील नागरिकांना या रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे विकासकामे करण्यास देखील अडचण येत आहे. त्यामुळे  संरक्षण खात्याने रेडझोन क्षेत्र  हटवावे या मागणीसाठी रेडझोन संघर्ष समितीने वारंवार आंदोलन केले आहे. प्रत्येकवेळी आश्वासन मिळाले. परंतु, प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.

स्थानिक नागरिक सुधीर झपके म्हणाले, “तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार, ए. के. अँटोनी, मनोहर पर्रिकर, निर्माला सितारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकडे रेडझोन संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. दिवंगत सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी तळवडे परिसरात प्रचारासाठी आले होते. त्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा कामाला आला होता. पर्रिकर यांनी रेडझोनचा प्रश्न समजावून घेतला होता.

गोव्यातील राजकीय तिढ्यानंतर पर्रिकर यांना पुन्हा गोव्यात परतावे लागले होते. गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर देखील रेडझोन संघर्ष समिती आणि आमदार महेश लांडगे यांनी खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. आमदार महेश लांडगे त्याबाबत अजूनही पाठपुरावा करीत आहेत. पुढील काळात हा प्रश्न नक्की मार्गी लागेल अशी आशा असल्याचेही सुधीर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.