Bhosari : आरपीआयचा आमदार महेश लांडगे यांना वाढता पाठिंबा

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्याबाबत आरपीआय’(A)चे कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिका-यांची अजिंठानगर येथे पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत महेश लांडगे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला कार्तिक लांडगे, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(A)चे महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चांदमारे. रि. पा. ई. अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, रि. पा. ई. शहर कार्यध्यक्ष रमेश सुर्यवंशी, रि. पा. ई. शहर उपाध्यक्ष विलास गरड, अल्पसंख्याक आघाडी शहर कार्यध्यक्ष शेखलाल नदाफ, रिपब्लिकन श्रमिक बिग्रेड महाराष्ट्र सरचिटणीस संदिपान साबळे, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ईलाताई ठोसर, महिला शहर कार्याध्यक्ष रत्नमाला सावंत, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी चळवळ वाढविण्यासाठी, आंबेडकरी विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात सक्रियपणे आरपीआयचे सर्व कार्यकर्ते उतरले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी भारतातील पहिले आणि जगातील दुसरे संविधान भवन भोसरी येथे उभारण्यासाठी सक्रीय योगदान दिले आहे असा विचार या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा निवडून द्यायलाच हवे, असा चंग सर्वांनी बांधला आहे. काही ठिकाणी आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवला जात आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघात कोणाचीही कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.