Bhosari : यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी 35 वर्षांपासून मिळणारा शब्द आमदार महेश लांडगे यांनी पाळला – सुनील जाधव

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी मागील 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासन दिले जायचे. हे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी पाळले असून त्यासाठी सक्रियपणे पाठपुरावा करून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे, असे मत यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी व्यक्त केले.

सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांची बैठक यमुनानगर येथे पार पडली. यामध्ये जाधव बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, गोपीचंद जगताप, शरद बो-हाडे, उत्तम केंदळे, बापू घोलप, आनंद यादव, नारायण ओंबाळे, संदीप चव्हाण, दीपक कुलकर्णी, शिवाजी कणसे, प्रशांत मळेकर, रवींद्र खिलारे आदी उपस्थित होते.

सुनील जाधव म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. स्मारकासाठी पालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला आहे. ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले. त्या बांधवांना आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भरगोस मदत करण्यात आली आहे. शासकीय मदत पोहोचण्यापूर्वी आमदार लांडगे यांची मदत पूरग्रस्त भागात पोहोचली आहे.”

आमदार महेश लांडगे म्हणाले, “एकसंघ महाराष्ट्र घडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं अपेक्षित आहे. राज्यातील, देशातील प्रत्येक नागरिक आपला बांधव आहे. त्यांची मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. आजवर शहरातील काही प्रश्न राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडले होते. विरोधकांनी प्रश्न न सोडवता त्याचे केवळ राजकारण केले. ते प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काम केले आहे. जनहिताचा स्वच्छ दृष्टिकोन ठेवून हे सरकार काम करत आहे. आपण सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यायला हवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.