Pune : माहेश्वरी समाजातर्फे दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजन व अन्नकोट महोत्सव

एमपीसी न्यूज –  माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव उत्साहात साजरा झाला. लोकांच्या रक्षणाकरिता करंगळीवर पर्वत उचलून धरणाऱ्या प्रसंगांची आठवण म्हणून गोवर्धन गिरिधारीचे पूजन आणि ५६ भोगाची (मिठाई व इतर पदार्थ) आरास करण्यात आली. या अन्नकोट महोत्सवात शहर व जिल्ह्यातील जवळपास चार हजार
माहेश्वरी बांधवांसह इतर समाजातील मान्यवर व भक्तगण सहभागी झाले होते. 

पावसामुळे काहीसा परिणाम झाला असला, तरी माहेश्वरी समाजातील लोकांचा उत्साह होता. ५६ प्रकारच्या भोगामध्ये मिठाई, फळे, दिवाळी फराळ आदी पदार्थ ठेवण्यात आले होते. कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या महोत्सवावेळी माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहानी, बालाप्रसाद बजाज, राजेंद्र भट्टड, मदनलाल भुतडा, हरी भुतडा, शामसुंदर कलंत्री, दिलीप धूत,
संतोष लढ्ढा, विजयराज मुंदडा, भंवरलाल पुंगलिया, अशोक राठी, महेश सोमाणी, रामबिलास तापडिया यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सचिव संजय चांडक म्हणाले, “गोवर्धन गिरिधारी यांच्या आठवणीतील पवित्र दिवस म्हणून अन्नकोट महोत्सव साजरा होतो. दरवर्षी माहेश्वरी समाजबांधव एकत्र येऊन दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव साजरा करतात. माहेश्वरी
चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुण्यात औषधोपचार व अन्य कामांसाठी बाहेरून येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती मुकुंदनगर या भागात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त सॅनेटोरियम, अतिथीगृह आणि बहुउद्देशीय प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असून, लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.