Mumbai : माहिममधल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

एमपीसी न्यूज : माहिम समुद्रातील अनधिकृत दर्ग्यावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. मुंबई समुद्रातील माहिम दर्गा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. समुद्रातील मजार बांधलेली जागा मोकळी करण्यात आली आहे.(Mumbai) जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ही मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता आणि कारवाईसाठी महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर रात्रीच जिल्हा प्रशासन जागे झाले आणि कारवाईचे आदेश दिले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीबाबत इशारा दिल्यानंतर तातडीने कारवाईला सुरूवात झाली. जिल्हाधिका-यांनी माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीच्या तोडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने तोडक कारवाईसाठी महापालिकेची मदत घेतली.

 

Crime News : वडमुखवाडी येथे गोळीबार करणाऱ्याला 48 तासात अटक

 

मुंबईत समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले होते.  यावेळी मोटा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.