Mahindra Thar: नव्या जनरेशनची महिंद्रा ‘थार’; आधुनिक वैशिष्ट्ये आणि नवीन बीएस 6 इंजिन

Mahindra Thar: New Generation Mahindra 'Thar'; Modern features and new BS6 engine यापूर्वीच्या मॉडलच्या तुलनेत नवीन थार ही आधुनिक आहे आणि नव्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आधुनिक वैशिष्ट्ये आणि नवीन बीएस-6 इंजिन या नव्या महिंद्रा थारमध्ये असणार आहे.

एमपीसी न्यूज – महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनी आपली नव्या जनरेशनची महिंद्रा थार लवकरच बाजारात लॉन्च करणार आहे. महिंद्रा थार या एसयूव्हीची पहिली झलक आज सर्वांना पाहायला मिळाली. त्यासोबतच कंपनीने हे सुद्धा जाहीर केले की, नेक्स्ट जनरेशन महिंद्रा थार ही भारतीय बाजारात 2 ऑक्टोबर रोजी लॉन्च केली जाणार आहे आणि त्याच दिवशी या एसयूव्हीचं बुकिंगसुद्धा सुरू होणार आहे.

यापूर्वीच्या मॉडलच्या तुलनेत नवीन थार ही आधुनिक आहे आणि नव्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आधुनिक वैशिष्ट्ये आणि नवीन बीएस-6 इंजिन या नव्या महिंद्रा थारमध्ये असणार आहे. इतकेच नाही तर नवीन थार एसयूव्हीमध्ये पेट्रोल इंजिनसह ऑटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

नवीन मॉडेलमध्ये काय आहे विशेष ?

मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन महिंद्रा थारमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. न्यू जनरेशन महिंद्रा थार एसयूव्हीमध्ये फर्स्ट इन-क्लास अ‍ॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्ससह सात इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम, इन्स्ट्रूमेंट कन्सोलसाठी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तसेच या एसयूव्हीमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस, हिल-होल्ड कंट्रोल, हिल-डिसेंट कंट्रोल यांसारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

न्यू जनरेशन महिंद्रा थार ही एसयूव्ही 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर एमस्टॅलियन टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होणार आहे.

डिझेल मोटर 130 बीएचपी, 320 एनएम टॉर्क जनरेट करते आणि सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच सिक्स स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.

तर पेट्रोल युनिट 320 एनएमसह 150 बीएचपी क्षमता आहे आणि ही केवळ ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. आधीच्या मॉडेलप्रमाणेच नवी महिंद्रा थार सुद्धा मेकॅनिकल डिफरेन्सियल 4×4 शिफ्ट ऑन फ्लाय ट्रान्सफर सह उपलब्ध आहे.

ही गाडी ‘रेड रेज’, ‘मिस्टिक कॉपर’, ‘नेपोली ब्लॅक’, अ‍ॅक्वामरिन’,’ गॅलेक्सी ग्रे’ आणि ‘रॉकी बेज’ या सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. नवीन ‘थार’मध्ये दोन दरवाजांचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यात आले आहे. ‘हार्ड टॉप’, या श्रेणीत प्रथमच सादर होणारे ‘मॅन्युअल कन्व्हर्टिबल टॉप’ आणि ‘फिक्स्ड सॉफ्ट टॉप’ असे तीन प्रकारच्या छतांचे पर्याय उपलब्ध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1