Pune: काशेवाडी येथे भीषण आगीत 7-8 घरे भस्मसात

एमपीसी न्यूज – भवानी पेठेतील काशेवाडीत रात्री आठच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 7-8 घरे भस्मसात झाल्याचे वृत्त आहे.

घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 17 गाड्या तसेच टँकर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असून ती पूर्ण विझविण्याचे काम सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

या दुर्घटनेत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीमुळे ज्या नागरीकांची घरे भस्म झाली आहेत, त्या कुटुंबाची व्यवस्था महापालिकेच्या समाजमंदिरामध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1