Pune: तुळशीबागेतील भीषण आगीत काही दुकानांचे नुकसान

एमपीसी न्यूज – पुण्यातील महिलांचे खरेदीसाठीचे प्रमुख आकर्षण असलेल्या तुळशीबागेत आज सायंकाळी भीषण आग लागून काही दुकानांचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात अाली आहे.

शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मंडई परिसरातील वाहनतळजवळ असलेल्या एका दुकानाला प्रथम आग लागली आणि ती आजूबाजूला पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीत किती दुकाने जळाली याची माहिती अद्याप उपलब्ध शकली नाही.

नेहमीच मोठी वर्दळ असणाऱ्या तुळशीबागेत आज प्रजासत्ताकदिनाची सुट्टी असल्याने नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली.

तुळशीबागेत अनेक प्रकारची छोटी छोटी दुकाने आहेत. त्यामुळे आग पसरणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. अचानक लागलेल्या आगिमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या ठिकाणी वाहन पार्कींग असल्याने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. आगीमुळे बघ्यांची गर्दी होऊन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.