Pune Fire : पुण्यात मार्केट यार्ड येथील गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील अगरवाल ट्रेडर्सच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी 10:03 मिनिटाच्या सुमारास भीषण आग लागली.(Pune Fire) अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

मार्केटयार्ड पुणे, गेट न.5, शॉप नंबर 490, अगरवाल ट्रेडर्स, ड्रायफूट, मसाल्याचे पदार्थ व किराणा मालाचे किरकोळ व होलसेल  दुकान आणि गोडाऊन व पोटमाळा येथे सोमवारी सकाळी 10:03 मिनिटाने आग लागली.  पुणे अग्निशमन कंट्रोलरूम ला फोन आल्या नंतर त्वरित नजीकचे सब स्टेशन गंगाधम अग्निशमन केंद्राची फायर गाडी रवाना केली, घटनास्थळी पोहचताच त्यांनी कळवले आग मोठी आहे,(Pune Fire) मदतीसाठी आणखी फायर कंट्रोलरूम मधून एक फायर गाडी व दोन टँकर रवाना झाले घटनास्थळी पोहचताच गोडाऊन व दुकानाच्या चारही बाजूने पाच होजच्या लाईन टाकून प्रथम आगीवर पाण्याचा मारा चालु केला धूर मोठ्या प्रमाणात झाला होता.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय चर्चासत्रात समता, बंधुता आणि मानवतेवर साहित्यिकांचा भर

त्याच वेळी दोन जवानांनी B A सेट परिधान करून धुरामध्ये प्रवेश केला आणि कुणीही आत अडकले नसल्याची खात्री केली, पाण्याचा मारा चालू असतानाच गोडाऊनच्या वरील बाजूस (Pune Fire) शिडीच्या सहाय्याने चढून वरील पत्रे बोल्ट कटर व कटावणीच्या साहाय्याने तोडून काढले व तेथून पाणी मारले व आग 10:20 मिनिटांनी कंट्रोल केली व कुलिंगचे काम चालू केले,

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी तीन फायर गाड्या व दोन टँकर वापरले आणि 15 दलाचे फायरमन जवान आणि स्टेशन ड्युटी ऑफिसर  प्रदिप खेडेकर,  सुनील नाईकनवरे यांच्या नेतृत्वा खाली संपूर्ण कारवाई झाली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.