Pimpri : भोगीसाठी बाजारात गर्दी

एमपीसी  न्यूज – मकर संक्रांतीच्या सणाच्या अगोदर एक दिवस अगोदर येणा-या भोगीसाठी पारंपारीक पध्दतीने घरोघरी बाजरीची भाकरी, विविध भाज्या,  असे पदार्थ बनविण्यात येतात. त्यामुळे शहरात भाज्या, तीळ, बाजरी, राळे, गाजर आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. भाज्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रातीकडे पाहिले जाते. भोगी दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर गाजर, कांदा पात, हळदी-कुंकु वाण (सुगड), तीळ-गुळ, तिळाचे दागिने खरेदी करीत संक्रातीच्या सणाची तयारी केली. तीळ-गुळाबरोबर सुवासिनीचे वाण देण्यासाठी विविध वस्तू खरेदीसाठी महिलांची बाजारात झुंबड उडाली आहे. मकर संक्रातीला सुवासिनी वाणामध्ये ओटीचे साहित्य, बिब्याची माळ, खाऊची पाने, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, डहाळे, ऊस, बोर घालून, पुजन सुगडावर हळदी कुंकु वाहतात आणि ववश्याचे पुजन करतात. संक्रातीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करून एकमेकांना तिळ-गुळ देऊन स्नेह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.