Vadgaon News : माळीनगर येथे रस्त्यावर गतिरोधक करा

भाजप युवा मोर्चाची नगरपंचायतकडे मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील माळीनगर भागात नव्याने रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालक वेगात वाहने चालवतात. परिसरातील लहान मुले, नागरिक रस्त्यावरून ये जा करत असतात. वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे या भागात भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माळीनगर भागात बनवलेल्या नवीन रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत अशी मागणी भाजप युवा मोर्चाने नगरपंचायकडे केली आहे.

माळीनगर भागांतर्गत नव्याने झालेले रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे सर्व प्रकारचे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवत असतात. तसेच या रस्त्यावरून पादचाऱ्यांचीही ये-जा चालू असते आणि रस्त्यालगत अनेक स्थानिक लहान मुले खेळत असतात.सुसाट वेगाने वाहने चालवत असताना मागील काही दिवसांत या रस्त्यावर अपघाताचे प्रकार घडले आहेत.

परंतु सुसाट वेगवान वाहनांमुळे येथे भविष्यातही जीवघेणे अपघात घडू शकतात.हे संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतीरोधक असणे गरजेचे असून लवकरात लवकर गतीरोधकाचे काम पुर्ण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा-युवा मोर्चाने स्थानिक नागरीकांच्या स्वाक्षरीसह नगरपंचायकडे केली आहे.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे,युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,प्रमोद म्हाळसकर,विराज हिंगे, समीर गुरव,कल्पेश भोंडवे,गणेश भिलारे शेखर वहिले,गोकुळ काकडे,कुलदीप ढोरे,सूर्यकांत भिलारे,आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.