Pimpri : मॉल, चित्रपटगृहातील पार्किंग निःशुल्क करा; राष्ट्रवादीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल, मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग निःशुल्क करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेकडे केली आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे, पंकज भालेकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मॉल आणि चित्रपटगृहांची संख्या जास्त आहे. याठिकाणी येणा-या नागरिकांची संख्या अधिक आहे. सद्यस्थितीत महापालिका हद्दीतील मॉल व चित्रपटगृहांसाठी राखीव असलेल्या पार्किंगसाठी संबंधितांकडून शुल्क आकारले जात आहे.

पुणे आणि नाशिक महापालिकेने मॉल व मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन त्याच धर्तीवर मॉल, मल्टिप्लेक्स या ठिकाणी पार्किंग निःशुल्क करावे. वाहतुकीच्यादृष्टीने पार्किंगबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.