Water Supply Department : पाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करा, पाणीपुरवठा विभागाला सूचना

एमपीसी न्यूज – शहरातील प्रत्येक भागातील पाणीपुरवठा (Water Supply Department) वितरण, हॉकर्स झोनचे व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत आढावा घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जनसंवाद सभेच्या समन्वयकांना दिले, त्याप्रमाणे जनसंवाद सभेत आलेल्या पाणी वितरण विषयक तक्रारवजा सूचनांवर चर्चा करून पाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना समन्वय अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

शहरातील पिण्याच्या पाणी वितरणाबाबत जनसंवाद सभेमध्ये तक्रारवजा सूचना येत असतात, त्या सोडविण्यासाठी तसेच प्रत्येक भागातील पाणी वितरण सुरळीत व्हावे याकरीता जनसंवाद सभेच्या समन्वय अधिका-यांनी आढावा घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेद्वारे प्रभावी उपाययोजना आणि नियोजन करण्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी निर्देश दिले होते. तसेच शहरातील हॉकर्सचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार हॉकर्सचे योग्य जागेवर स्थलांतर करण्यासाठी देखील प्रभाग स्तरावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले होते.

PCMC Guidelines : नैसर्गिक आपत्तीपासून जीवितहानी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, महापालिकेचे आवाहन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील (Water Supply Department) नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. आज पार पडलेल्या  जनसंवाद सभेत सुमारे 98 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 21, 6, 7, 10, 4, 12, 24 आणि 14 नागरिकांनी जनसंवाद सभेत सहभाग घेतला. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, समाज विकास विभागाचेउप आयुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शीतल वाकडे, अभिजित हराळे,  अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड , राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात यांच्यासह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता  आदी उपस्थित होते.

जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. नागरिकांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी  नागरी सुविधा केंद्र उभारावेत, स्वच्छ व उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करावा, पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी, करभरणाप्रणाली सुलभ करून ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी QR कोड, गुगल पे आदी सहज व सुलभ यंत्रणा उपलब्ध करून द्यावी,  सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करावी,  अपूर्ण रस्ता डांबरीकरणाचे कामे जलदगतीने करावीत,  तुटलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांची लवकर दुरुस्ती करावी, मलनिस्सारण वाहिन्यांसाठी खोदण्यात आलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, रस्त्यावरील राडारोडा तात्काळ उचलण्यात यावा तसेच इतरत्र राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, महापालिकेने अतिक्रमण हटवलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतनाशक फवारणी करावी, अनधिकृत नळ जोड देऊ (Water Supply Department) नयेत अशा सूचना नागरिकांनी आज झालेल्या जनसंवाद सभेत मांडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.