Malavali : किल्ले विसापूरवर शिवमंदिर वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज- लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे किल्ले विसापूर वरील शिवमंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पुरातत्व विभागातर्फे गडावरील शिव मंदिराचा तीन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला. या मंदिरासाठी मंचातर्फे सातत्याने पुरातत्व विभागाचा पाठपुरावा करण्यात आला .त्याचे औचित्य साधून तसेच तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन याचे औचित्य साधून हे वृक्षारोपण करण्यात आले.

पुरातत्व विभागातर्फे गडावरील शिव मंदिराचा तीन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला. या मंदिरासाठी मंचातर्फे सातत्याने पुरातत्व विभागाचा पाठपुरावा करण्यात आला .त्याचे औचित्य साधून तसेच तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन याचे औचित्य साधून हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सकाळी शिव मंदिरात मंचचे उपाध्यक्ष सचिन निंबाळकर व अनिकेत आंबेकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. गेली 19 वर्षे मंचातर्फे लोहगड व विसापूर येथे अनेक उपक्रम राबवले जातात.

या कार्यक्रमात मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी शिवमंदिराच्या काम पूर्ण केल्याबद्दल पुरातत्व विभागाचे आभार मानले. त्याचबरोबर हे काम झाल्यानंतर पुरातत्व विभागाकडून गेल्या तीन वर्षात विसापूर व कुठलेही काम झाले नाही याबद्दल खंत व्यक्त केली. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे तटबंदी दिवसेंदिवस कोसळत आहे त्यासाठी ताबडतोब दुरुस्तीची आवश्यकता आहे पुरातत्व विभागाने ही कामे ताबडतोब केली पाहिजे असे आवाहन टेकवडे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन मंचाचे अध्यक्ष संदीप गाडे, मुकुंद तिकोने, सागर कुंभार, अमोल गोरे, अरुण काकडे, विठ्ठल पापळ यांनी केले. कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे कर्मचारी दीपक काळभोर, किशोर भोसले, नवीत झेंडे, गुणवंत डाफळे हे उपस्थित होते. तसेच पुरातत्व विभागाचे दहिभाते साहेब, हेमंत वाघमारे, रोहित नगीने हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.