Pune News : बुरखाधारी महिलांचा ‘मालेगाव-औरंगाबाद’ पॅटर्न उघडकीस

तीन गुन्ह्यात नऊ आरोपी पोलिसांकडून जेरबंद

एमपीसी न्यूज : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि औरंगाबाद येथून पुणे शहरात येवून नामांकित बाजारपेठ मधील उच्चभ्रू दुकानातून महागडे साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बुरखाधारी महिलांच्या तीन टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. सदर तीन प्रकरणात एकूण नऊ आरोपी अटक करत पोलिसांनी दोन लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

शबाना जमिर कुरेशी ( वय-३५, रा.चाऊस कॉलोनी, औरंगाबाद) , शबाना सादिक कुरेशी (३५, औरंगाबाद) यांचाकडून एक लाख १५ हजार रुपये किमतीचे महागडे साड्या, कपडे जप्त करण्यात आले आहे. इरफना इस्माईल शेख (३७), सहीदा राहिमतुल्ला अन्सारी (३५, दोघी रा. मालेगाव) यांना ताब्यात घेऊन चोरीच्या दोन तोळे सोने विक्रीतील 57 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. तर, मुंढवा पोलीस ठाण्याचे गुन्ह्यात शांता दशरथ गायकवाड(५०), लक्ष्मी दीपक जाधव (६०), लक्ष्मीबाई परशुराम गायकवाड(५०), विलास धनप्पा जाधव (६१), परशुराम गायकवाड (४९) या पाच आरोपींना गजाआड करून 47 हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, मालेगाव प्रकरणातील महिला या भाड्याने कार करून पुण्यात खरेदीच्या बहाण्याने आल्या. पुण्यात आल्यानंतर त्यांची भाड्याची कार एका ठिकाणी लावून रिक्षाने त्या दिवसभर वेगवेगळ्या दुकानात खरेदी साठी फिरल्या. परंतु नामांकित दुकानात जाऊन खरेदी करण्या ऐवजी त्या बुरख्याच्या आत माल चोरी करून पसार होत होत्या. सीसीटिव्ही फुटेज मध्ये त्यांची चोरी कैद झाली आणि त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांचे पथकाने तपास करत धुळे, नाशिक, मालेगाव, अहमदनगर,औरंगाबाद आदी ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेऊन जेरबंद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.