Pune News : दुचाकी चोरणारे मामाभाचे जेरबंद, सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : बारामती पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या मामा भाच्याच्या जोडीला जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून त्यांनी चोरलेल्या एक लाख 80 हजार रुपयांच्या सहा दुचाकी जप्त केले आहेत. संदीप बाळू माने (वय ३५ वर्ष,रा.खंडोबा नगर,बारामती) व स्वप्नील काळूराम भोसले (वय २७ वर्षे ,राहणार.निरवागज, ता. बारामती) अशी मोटरसायकल चोरणाऱ्या मामा भाच्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दरम्यान पोलिसांना गुप्तपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यामामा भाषेच्या जोडीला ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

आरोपीनी बारामती तालुका व बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील दोन वर्षापासून २ स्टार सिटी, १ पॅशन, २ स्प्लेंडर, १ सुझुकी, अशा सहा मोटरसायकली चोरल्याचे समोर आले आहे. या मामा भाच्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपी संदीप माने हा मोटरसायकल चोरी करणारा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.