Talegaon : घरफोडी करून मोबईल, लॅपटॉप चोरणा-या एकाला अटक

एमपीसी न्यूज – खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या महिलेच्या घरात चोरी करून तीन चोरट्यांनी दोन मोबईल फोन आणि एक लॅपटॉप चोरून नेला. यातील एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. चोरट्याकडून चोरी केलेला एक मोबईल फोन जप्त करण्यात आला आहे.

आनंद सनमोगम एनडी (वय 19, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. एनडी आणि त्याच्या जोएल भास्कर पलानी (रा. गहुंजे), कादिर कलीम खान (रा. देहूरोड) या दोन साथीदारांनी मिळून गजानन सोसायटी, गहुंजे येथील एका घरात चोरी केली होती. याबाबत दामिनी दामोदर फाळके (वय 40) यांनी 17 ऑक्टोबर 2020 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक बनकर आणि पोलीस शिपाई कोकणे यांना माहिती मिळाली की, गहुंजे येथे घरफोडी केलेला आरोपी गहुंजे येथील एका गरेज समोर थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आनंद एनडी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा मोबईल फोन सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या आणखी दोन साथीदारांसोबत मिळून गहुंजे येथून घरफोडी करून एक लॅपटॉप आणि दोन मोबईल फोन चोरून नेल्याचे सांगितले. आरोपीला पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दामिनी फाळके आणि त्यांच्या दोन मुलांवर दामिनीच्या पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्यांना देहूरोड पोलिसांकडून 8 डिसेंबर 2019 रोजी अटक करण्यात आली होती. तर लहान मुलाला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मुलगा बालसुधारगृहातून मे 2020 मध्ये सुटून बाहेर आला. तर दामिनी यांचा जामीन मंजूर झाल्याने त्यांचीही ऑगस्ट 2020 मध्ये कारागृहातून सुटका झाली.

कारागृहात असताना त्यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. दरम्यान 25 मार्च ते 5 एप्रिल 2020 या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून लॅपटॉप आणि दोन मोबईल फोन असा एकूण 54 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.