Chinchwad News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी पेपर टाकणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : पेपर टाकण्यासाठी आलेल्या तरुणाने एका महिलेसोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी पावणे आठ वाजता दळवीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पेपर टाकणा-या तरुणाला अटक केली आहे.

अनिल बाबू झिले (वय 28, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल हा घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतो. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता दळवीनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये पेपर टाकण्यासाठी आला. पेपर टाकून जिन्यातून खाली उतरत असताना फिर्याद पीडित महिला पिण्याचे पाणी घेऊन जिन्यातून वर जात होत्या. आरोपी अनिल याने फिर्यादी महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपी अनिल याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.