Lonavala : महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतल्याप्रकरणी व्यक्तीला अटक

आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – येथील खत्री पार्क सोसायटीमधील एका बंगल्यात महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतल्याप्रकरणी इसमाला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याला न्यायालयाने सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खत्री पार्क सोसायटीमध्ये एक व्यक्ती महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, रऊफ इनामदार, ज्ञानेश्वर क्षिरसागर, सुरेखा कोरफड यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खत्री पार्क सोसायटीमधील शिवतिर्थ बंगला क्रमांक दोनमध्ये छापा टाकत सखाराम तुकाराम पाटील (वय 39, रा.खत्री पार्क सोसायटी, वलवण लोणावळा) याला अटक केली.

त्याला वडगाव न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.