Wakad News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यात ती मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली आहे.

अशोक कमलेश राजभर (वय 19, रा. कल्याण ईस्ट, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 14) फिर्याद दिली आहे.

हा प्रकार ऑगस्ट 2020 ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत पवना नदीच्या काठी, थेरगाव येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या इच्छे विरुद्ध आरोपी तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यात ती गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.