Pune Gramin News : इनोव्हा गाडीतून विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्याला अटक

सोळा लाखाचा मद्यसाठा जप्त

एमपीसी न्यूज : बारामती शहर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा मद्याची वाहतूक करणारी एक इनोव्हा गाडी जप्त केली. पोलिसांनी यावेळी एकाला अटक केली असून इनोवा गाडीतील 16 लाख 78 हजाराचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. राहुल पोपट शिरसाट (रा. वंजारवाडी तालुका बारामती) असे आरोपीचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना शहरातील इंदापूर चौकात एका चारचाकी गाडीत मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी इंदापूर चौकात या चार चाकी गाडीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्यसाठा आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी हा सर्व  मद्यसाठा जप्त केला असून गाडीमध्ये असलेल्या राहुल शिरसाट याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.