Pimpri Crime News : नऊ वर्षीय मुलाला धारदार शस्त्राने मारले

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना एका तरुणाने नऊ वर्षीय मुलाला धारदार शस्त्राने मारले. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी दीड वाजताच्या सुमारास गांधीनगर, पिंपरी येथे घडली.

सोहेल जावेद अन्सारी (वय 9) असे जखमी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सोहेलचे वडील जावेद रियाज अन्सारी (वय 39, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबासाहेब अशोक साळवे (वय 21, रा. गांधीनगर, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गांधीनगर येथील एका केश कर्तनालयासमोर आरोपी बाबासाहेब याने काहीही कारण नसताना सोहेल याच्या डाव्या गालावर धारदार शस्त्राने मारले. यामध्ये सोहेल जखमी झाला, त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.