Hinjawadi Crime News : धक्कादायक! घरगुती कारणावरून पत्नीवर सु-याने हल्ला

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन हातावर सुरा मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली . याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बावधन येथे बुधवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

राहुल ज्ञानबा खिल्लारे (वय 40, रा. रमाबाई नगर, अनसिंग, ता. जि. वाशीम) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. ज्योती राहुल खिल्लारे (वय 37, रा. बावधन, पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा पती आहे. मात्र ते दोघेही एकत्र राहत नाहीत. राहुल खिल्लारे यांनी घरगुती कारणावरून त्यांची पत्नी तसेच पत्नीच्या बहिणीला व मुलाला शिवीगाळ केली. दरम्यान, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही देत खिल्लारे यांनी सुरा घेत पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हातावर सुरा मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.