Sangvi Crime News : फोनवर बोलत असताना संशय घेऊन पत्नीला बेदम मारहाण; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नी फोनवर बोलत असताना तिच्यावर संशय घेऊन पतीने हायड्रोलिक ऑइल पाइपने मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री विशाल नगर, पिंपळे निलख येथे घडली.

महेश खेमराज नेपाळी (वय 25 रा. तनिष्का बिल्डिंग, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नेपाळी यांच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी पत्नी या हाऊसकिपिंग करणाऱ्या मालकीणीशी (नाव माहित नाही) फोनवर बोलत होत्या. त्यावेळी दारासमोर उभ्या असलेल्या आरोपी पती महेश याने “तु कोणा सोबत बोलत होती?’ अशी विचारणा करत फिर्यादी पत्नीस हायड्रोलिक ऑइल पाइपने पाठीवर, मांडीवर, हातावर, कानावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.