Hinjawadi Crime News : पत्नीला भेंडीच्या झाडाच्या ओल्या फोकाने मारहाण

एमपीसी न्यूज – पत्नीला भेंडीच्या ओल्या झाडाने मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 28) कासारसाई येथे घडला.

गणेश सुदाम शितोळे (वय 47, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि फिर्यादी महिला हे पती-पत्नी आहेत. गुरुवारी ते त्यांच्या शेतात काम करत होते. पती गणेश याच्या मैत्रिणीच्या कारणावरून गणेश याने त्याच्या पत्नी फिर्यादी यांना शेतातील भेंडीच्या झाडाच्या ओल्या लाकडाने पाठीवर, पायावर, कमरेवर मारले. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व चपलेने मारून अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.