Hinjawadi Crime News : पत्नीची दुचाकी तिच्या परस्पर विकल्याने पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या परस्पर तिची दुचाकी पतीने एकाला विकली. याप्रकरणी पत्नीने पती आणि दुचाकी खरेदी करणारी व्यक्ती या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2021 या कालावधीत मोहननगर, बाणेर येथे घडली.

नमिता कुमारी ब्रह्मदेव प्रसाद (वय 33, रा. मोहननगर, बाणेर, पुणे. सध्या रा. नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती स्वप्नील प्रभाकरराव सुखदेव (वय 37, रा. पांजरी, नागपूर), रवी मांडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नवी दिल्ली येथे नोकरी लागल्याने त्यांनी त्यांची मोपेड दुचाकी त्यांच्या मोहननगर, बाणेर येथील घराच्या पार्किंग मध्ये पार्क करून ठेवली. ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2021 या कालावधीत फिर्यादी यांचे पती स्वप्नील सुखदेव यांनी फिर्यादी यांच्या परस्पर त्यांची संमती न घेता त्यांची दुचाकी रवी मांडेकर यांना विकली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.