Man ki Baat : ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी ‘या’ विविध भारतीय बनावटीच्या ॲपची केली प्रशंसा

आत्मनिर्भर भारत ॲप निर्माण प्रतियोगिता अंतर्गत युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेचा पुनरुच्चार केला. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या विविध ॲप्लिकेशन्स दाखला दिला तसेच भारतीय नागरिकांनी हे ॲप्लिकेशन वापरण्यास पसंती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत ॲप निर्माण प्रतियोगिता अंतर्गत युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

दोन तृतीयांश प्रवेशिका श्रेणी-दोन आणि श्रेणी-तीन शहरांमधून आल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. विविध प्रवर्गातील 24 पेक्षा अधिक ॲप्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले, श्रोत्यांनी या ॲपचा वापर करावा, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी यापैकी बऱ्याच ॲपविषयी सांगितले, कुटूकी कीडस लर्निंग ॲप हा ॲप बालकांच्या शिक्षणासाठी संवादात्मक ॲप आहे, मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील कु कू कू , चिंगारी ॲप हे युवावर्गात लोकप्रिय होत आहेत.

शासकीय योजनांच्या माहितीसाठी ‘आस्क सरकार’ नावाचा ॲप आहे, स्टेप सेट गो, हा शारिरीक तंदुरुस्तीसंदर्भातील ॲप आहे.

पंतप्रधान म्हणाले, आजचे लहान-लहान स्टार्टअप्स उद्या मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये रुपांतरीत होतील आणि जगामध्ये भारताची वेगळी ओळख बनेल.

जगात आज मोठ्या असणाऱ्या कंपन्या, एकेकाळी स्टार्ट अप्स होत्या, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.