Pimpri : मॅनेजर महिलेने दुकानातील पावणेतीन लाखांचे  मोबाईल केले लंपास

एमपीसी न्यूज – स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणार्‍या एका महिलेने मोबाईल दुकानातील 27 महागडे मोबाईल, स्पेअर पार्ट असा 2 लाख 86 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील एम.एम. सर्व्हिस या मोबाईल दुकानात घडली.

याप्रकरणी कामिनी अंकुशराव पवार (वय 33, रा. बदलापुर) या महिलेवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनिष भरत असवानी (वय 38, रा. पिंपरी कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी असवानी यांचे पिंपरीतील साई चौकात एम.एम. सर्व्हिस नावाने मोबाईल दुकान आहे. या दुकानात आरोपी कामिनी स्टोअर मॅनेजर म्हणून काम करत होती. तिने दुकानातील  सॅमसंग कंपनीचे 27 मोबाईल, स्पेअर पार्ट असा 2 लाख 86 हजार 399 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार निकम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.