Manchar Crime News  : व्यवसायामध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून सव्वासात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एलईडी टीव्हीच्या व्यवसायात 50 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून आंबेगाव तालुक्यातील भावडी येथील एकाची 7 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र शिवराम कड (रा. किवळे, कडवस्ती, ता. खेड), राजू हिरामन रौंधळ (रा. पाईट, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अतुल रामदास काळे (वय 32, रा. भावडी) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2017 ते आजपर्यंत मंचर येथे रवींद्र शिवराम कड, राजू हिरामन रौंधळ यांनी संगनमत करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने, एल.ई.डी टीव्हीच्या व्यवसायात 50 टक्के भागीदारी देतो, असे अमिष दाखवून अतुल रामदास काळे यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या खात्यावर असलेले आणि रोख रक्कम अशी एकूण 7 लाख 25 हजार रुपये घेतले.

एल.ई.डी टीव्ही व्यवसायात कोणत्याही प्रकारे भागीदारी न देता व्यवसाय बंद करून, तसेच अतुल काळे यांच्या नावे असलेला ट्रॅक्टर रवींद्र कड आणि राजु रौंधळ यांनी स्वतःकडे ठेवून घेतला. त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अतुल काळे यांना न देता, तसेच ट्रॅक्टर परत न देता अतुल काळे यांची फसवणूक केली.

अतुल काळे यांनी पैशांची मागणी केली असता संबंधित दोघांनी दमदाटी करून धमकी दिली. अतुल काळे यांनी संबंधित दोघांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.