Manchar Crime News : अज्ञात कारणावरून एकाचा गळफास लावून खून

एमपीसी न्यूज – अज्ञात कारणावरून एकास गळफास लावून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 8 ते 12 जुलै 2021 दरम्यान मंचर परिसरात हा प्रकार घडला.

कैलास सोमनाथ ठाकूर (वय 40, रा. मंचर, ता. आंबेगाव ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी मयत इसमाचा भाऊ दत्तात्रय सोमनाथ ठाकूर (वय 40) यांनी मंगळवारी (दि.13) मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक साळुंखे उर्फ फारुख याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास ठाकूर यांचा दीपक साळुंखे याने अज्ञात कारणावरून गळफास लावून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंचर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.