Manchar Crime News : मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आणि पंधरा हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे.

संभाजी बाबुराव राजगुरू (वय 32), सुनील दिलीप पवार (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मंचर पोलिसांना भराडी येथे दोन व्यक्ती मांडूळ जातीचा साप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना थांबवण्याचा इशारा केला.

परंतु त्यांनी दुचाकींना थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या एका ड्रममध्ये दोन मांडूळ साप आढळून आले.

पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांनी हे मांडूळ कुठून आणले याची चौकशी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.