Manchar News : मंचर गोळीबार प्रकरणातील गुंड ओंकार बाणखेले खून प्रकरणी संशयित आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एकलहरे गावच्या हद्दीत गुंड ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला होता. एक ऑगस्ट 2021 रोजी दुपारी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी आता एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

राम सुरेश जाधव ( वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) असे या संशयीत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुंड ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याचा एक ऑगस्ट रोजी डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल होती. याबाबत गुन्ह्यातील आरोपीचा शोध चालू होता.

दरम्यान, गुन्ह्यातील संशयित आरोपी रामा जाधव हा राजगुरुनगर, खेड येथे येणार असल्याची गुप्त माहिती मंचर पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने खेड एसटी स्टँड येथून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला पुढील तपासासाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.