Manchar : पाय घसरून पडलेल्या मुलीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील मंचर जवळ एक दुर्दैवी घटना (Manchar) उघडकीस आली आहे. पाय घसरून पाण्यात बुडू लागलेल्या बारा वर्षीय मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंचर जवळील एकलहरे गावच्या हद्दीत गुरुवारी घडली.

प्रीती श्याम खंडागळे (वय 17) आणि आरती शाम खंडागळे (वय 18) अशी या दोघा बहिणींची नावे आहेत. या दोघी बहिणी मुंबईच्या रहिवासी आहेत. मात्र एका वाढदिवसानिमित्त त्या मुंबईहून एकलहरे गावी आल्या होत्या.

Pune Crime : पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी वकील महिलेवर गुन्हा दाखल

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर कपडे धुण्यासाठी पाच जणी नदीवर गेल्या होत्या. कपडे धुत असताना यातील एका मुलीचा पाय घसरला आणि ती नदीच्या पाण्यात पडली. ती बुडत असल्याचे पाहून प्रीती आणि आरती या दोघींनी तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघीही बुडाल्या. या घटनेत मात्र बाहेर पडून खोल पाण्यात पडलेली बारा वर्षे मुलगी बचावली.

आरती आणि प्रीती बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी तीन मुलीही पाण्यात उतरल्या होत्या पण नाका तोंडात पाणी जात असल्याने त्या लगेच बाहेर आल्या. दरम्यान या दोघी बुडत असल्याचे पाहून काठावरील महिलांनी आरडाओरडा केला त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ धावून आले. त्यांना तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघीचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.