Mandip Singh Tested Positive : भारतीय हॉकीपटू मनदीप सिंहला कोरोनाची लागण

स्पोर्ट्स अथाॅरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती दिली आहे. : Indian hockey player Mandeep Singh corona

एमपीसी न्यूज – भारतीय हॉकी संघाचा युवा खेळाडू मनदीप सिंहचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. स्पोर्ट्स अथाॅरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती दिली आहे.

भारतीय हॉकीपटू सध्या स्पोर्ट्स अथाॅरिटी ऑफ इंडियाच्या बंगळुरुच्या नॅशन कँपमध्ये सराव करत आहेत. मनदीप हा कोरोनाची लागण झालेला भारताचा सहावा हॉकीपटू ठरला आहे.

मनदीप व्यतिरीक्त कर्णधार मनप्रित सिंह, बचावपटू सुरेंद्र कुमार, जसकरण सिंह, ड्रॅग फ्लिकर वरुण कुमार आणि गोलकिपर क्रिशन बहादुर पाठक यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

या सर्व खेळाडूंमध्ये कोरोनाची सध्या सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.