Chinchwad : भाद्रपदी यात्रेसाठी मंगलमूर्ती पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज – टाळ व मृदंगाच्या गजरात ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात आज (सोमवारी)  दुपारी चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यातून श्रीं च्या पालखीने मोरगावकडे प्रस्थान ठेवले. पालखी प्रस्थानाबरोबरच मोरया गोसावी भाद्रपदी यात्रेला सुरुवात झाली आहे.

भाद्रपदी यात्रेनिमित्त चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिरापासून मोरगावकडे प्रस्थान झालेल्या श्री मंगलमूर्तीच्या पालखी सोहळ्याचे महापालिकेच्या वतीने उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी श्री मंगलमूर्तीस पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले. यावेळी ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, अडॅ. राजेंद्र उमाप, विनोद पवार उपस्थित होते.

मोरया गोसावी हे माघ व भाद्रपद महिन्यात मयुरेश्वराच्या दर्शनाला मोरगावला पायी जात. हीच परंपरा कायम राखून आजही माघ व भाद्रपद या दोन महिन्यात यात्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.