Moshi : महिलेला चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज – घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून 84 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी गंधर्वनगरी मोशी येथे घडली.

जिस्मी रिजो अँटोनी (वय 31, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा वाजवला. फिर्यादी यांच्या मुलीने दरवाजा उघडला. त्यावाटे आरोपी घरात आला. त्याने जीस्मी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाचे 84 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like