Pune Robbery Case : माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेताना तीन महिलांचे चोरले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत असताना तीन महिलांचे मंगळसूत्र अज्ञात महिलेने चोरल्याचे (Pune Robbery) उघडकीस आले आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना शरद गायकवाड (वय 27) या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. येरवड्यातील इंदिरानगर येथे बुधवारी हा प्रकार घडला.

Pune Crime News : 5 लाखाच्या बदल्यात 15 लाख दिले तरी 8 लाखाची मागणी, खासगी सावकाराला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी सायंकाळी पुण्यात आगमन झाले. तत्पूर्वीही पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने येत असताना इंदिरानगर येथील दत्त मंदिरासमोर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी महिला, त्यांच्यासोबत शालिनी मुसळे आणि ज्योती रणधीर असे तिघेजण आले होते. दर्शन घेत असताना अज्ञात महिलेने या तिघींच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन (Pune Robbery) नेले. त्याप्रकरणी एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.