Pune News : पायी निघालेल्या महिलेला भररस्त्यात अडवून मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज : दुपारच्या सुमारास पायी चालत निघालेल्या महिलेच्या समोर दुचाकी आडवी लावून तिच्या गळ्यातील एक लाख 86 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले आहे. मुंबई बंगलोर महामार्गावरील वारजे स्मशानभूमी लगत असणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी एका साठ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून दुचाकीवरील एक पुरुष आणि महिला विरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या मुंबई बंगलोर महामार्गावरील वारजेच्या हद्दीत असणार्‍या स्पशानभूमी जवळून पायी जात होत्या. यावेळी एक मोटारसायकल त्यांच्याजवळ आली. या मोटरसायकलवर एक महिला आणि एक पुरुष असे दोघे जण बसले होते.

त्यांनी फिर्यादी महिलेला मोटार सायकल आडवी लावून त्यांच्या गळ्यातील 55.150 ग्रॅमचे 1 लाख 86 हजार 790 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.