BNR-HDR-TOP-Mobile

Maval : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारीपदी मंगेश खैरे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारीपदी वडगाव मावळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते मंगेश पांडुरंग खैरे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी खैरे यांना पुणे येथील पक्षकार्यालयात आज (दि18) रोजी नियुक्तीपत्र दिले.  यावेळी राज्य समन्वयक सुहास उभे, ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, पुणे ओबीसी सेल शहराध्यक्ष संतोष नांगरे, मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत व पदाधिकारी उपस्थित होते.

मंगेश खैरे हे गेली अनेक वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते स्थापनेपासून क्रियाशील सदस्य आहेत. श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत. उत्तम संघटक म्हणून ते ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी वडगाव शहर राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3