Pune : मनीषा साठे यांना ‘सारंग सन्मान’ प्रदान

'मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' च्या तपपूर्तीनिमित्त सन्मान सोहळा

एमपीसी न्यूज- ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या तपपूर्तीनिमित्त ज्येष्ठ नृत्यांगना ,नृत्यगुरू मनीषा साठे यांना ‘सारंग सन्मान’ प्रदान करण्यात आला. सकाळ उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पं. राजेंद्र गंगाणी, पं. योगेश शमसी, मुकुंद संगोराम (कलासमीक्षक आणि संपादक, ‘लोकसत्ता’, पुणे) , तपपूर्ती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष ॲड . शीतल चव्हाण , ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या संस्थापक अर्चना संजय यावेळी उपस्थित होत्या .

“कलाकारांचे आयुष्य हे खूप खडतर आणि संघर्षमय असते, यश लाभणे, अर्थार्जन होणे आणि चरितार्थ चालणे ही खूप अवघड गोष्ट आहे
त्यामुळे कलाकारांना राजाश्रय, समाजाचा नैतिक व आर्थिक पाठिंबा लाभणे आवश्यक आहे “असे मत प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.

“या पुरस्काराने मला नवी उर्मी दिली त्यामुळे मी नृत्य कलेची अशीच अखंड सेवा करीत राहीन . ज्या कलाकाराकडे खरे आत्मिक सौंदर्य असते तेच अधिक सुंदररित्या बाह्य जगापर्यंत आपली कला प्रकर्षाने पोचवू शकतात,चांगली कला सादर करू शकतात”,असे मत मनीषा साठे यांनी व्यक्त केले.

“महाराष्ट्रात खरेतर संगीत नृत्य परंपरा पूर्वीपासून नव्हती ,पण पुण्यातील नृत्य कलावंतांनी नृत्याला मान सन्मान मिळवून दिला.
पुण्यानं संगीत ,नृत्य क्षेत्रात जे कार्य केले त्याला देशात तोड नाही. त्याअर्थाने पुणे ही नृत्य शिक्षणाची राजधानी म्हणावी ,एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात विद्यार्थी नृत्य शिक्षण घेतात. यासाठी देशाने पुण्याचे यासाठी आभार मानले पाहिजेत ” असे मत मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले.

तपपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर पं. योगेश शमसी आणि पं. राजेन्द्र गंगाणी यांचे सादरीकरण झाले. प्रास्तविक अर्चना संजय यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.