Pune News : कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मराठे ज्वेलर्सचे मालक मंजिरी मराठे, कौस्तुभ मराठे अटकेत

एमपीसी न्यूज : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मराठे ज्वेलर्सचे मालक मंजिरी मराठे (वय 48) आणि कौस्तुभ मराठे (वय 54) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतवलेल्या रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वी प्रणव मिलिंद मराठे (वय 26) याला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी मयत मिलिंद उर्फ बळवंत मराठे, नीला मिलिंद मराठे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल आहे. लक्ष्मी रस्ता आणि पौड रस्त्यावर मराठे ज्वेलर्सच्या शाखा आहेत. या शाखांमध्ये 2017 ते 2021 या कालावधीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी शुभांगी विष्णू कुटे (वय 59) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूकदारांना रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या स्वरुपात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकूण 18 गुंतवणूकदारांची पाच कोटी 9 लाख 72 हजार 900 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. या प्रकरणात 21 मार्च 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.